Unseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी
महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर काही भागात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहे. राज्यात सध्या संमिश्र वातावरण आहे. नागपुरला आज अवकाळी पावसाचा तडखा बसला आहे. विजांच्या कडकडाटासह नागपुरात अवकाळी पाऊस बरसला आहे. नागपुर प्रादेशिक हवामान विभागानेही नागपुरसाठी यल्लो अलर्ट दिला होता.
पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसला आहे. नागपुरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळच्या 9च्या सुमारास झालेल्या पावसामुळं अनेकांची तारांबळ उडाली. दक्षिण भारतात सायकलोनिक सर्क्युलेशन तयार झाल्यामुळे पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण व पाऊस पडण्याचा अंदाज नागपुर विभागाने वर्तवला आहे. दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळं पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सध्या उन पावसाचा खेळ सुरू आहे. मागील आठवड्यापासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळं उकाड्यापासून आराम मिळाला असला तरी काही भागात पिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा इशारा असला तरी मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या झळा बसणार आहेत. 25 एप्रिलपर्यंत येथे उकाडा जाणवणार आहे.हवामान विभागाने राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच असणार आहे, अशी शक्यता वर्तवली आहे.
Weather Updates Weather Update Maharashtra Maharashtra Weather Alert Maharashtra Weather Update Weather Department Unseasonal Rain In Nagpur Nagpur Rain Alert Nagpur News
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
महाराष्ट्रात दुबईचा फिल! सोलापुरात पुरजन्य परिस्थिती; अनेक जिल्ह्यात तुफान पाऊसमहाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडत आहे.
Weiterlesen »
Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसराज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
Weiterlesen »
Maharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलराज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
Weiterlesen »
Maharashtra Weather News : Alert! कुठे उष्णतेची लाट, कुठे पाऊस; हवामानातील 'हे' बदल आणखी अडचणी निर्माण करणारMaharashtra Weather News : हवामान विभागानं राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता नागरिकांना सतर्क करत हवामान बदलां विषयी महत्त्वाचा इशारा दिला आहे.
Weiterlesen »
Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
Weiterlesen »
LokSabha : उत्तर मुंबई लोकसभेचा 'पंचनामा', पियूष गोयल यांच्यासाठी कसं असेल विजयाचं गणित?North Mumbai Loksabha : उत्तर मुंबई मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं अजून उमेदवार दिलेला नाही. काय आहेत या मतदारसंघातली गणित, पाहूयात रिपोर्ट
Weiterlesen »