बदलापूर अत्याचार प्रकरणः शाळेतील आणखी काही मुलींसोबत दुष्कृत झाल्याचा संशय; SITकडून पालकांना SMS

Badlapur Sexual Assault Case Nachrichten

बदलापूर अत्याचार प्रकरणः शाळेतील आणखी काही मुलींसोबत दुष्कृत झाल्याचा संशय; SITकडून पालकांना SMS
Badlapur School CrimeBadlapur CrimeMumbai High Court
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 93%
  • Publisher: 63%

Badlapur Sexual Assault Case: बदलापूर अत्याचार प्रकरणात सतत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता एसआयटीने आणखी एक नवी शक्यता वर्तवली आहे.

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. या प्रकरणानंतर राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली होती. आता तपास यंत्रणाने या प्रकरणात धक्कादायक संशय व्यक्त केला आहे. त्यामुळं अनेक पालकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे.

बदलापूर येथील एका नामांतर शाळेत तीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. शाळेतीलच सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांनी चिमुरडींनी स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले होते. पीडित चिमुकलीच्या गुप्तांगाला गंभीर इजा झाल्यानंतर तिने तिच्या पालकांना सांगितले. जेव्हा त्यांनी वैद्यकीय तपासणी केली तेव्हा हा सगळा प्रकार उघड झाला आहे. या घटनेनंतर बदलापूरात पालकांचा पोलिस आणि शाळा प्रशासनाविरोधात एकच भडका उठाला.

बदलापूर अत्याचार प्रकरणात एसआयटी सजग राहून तपास करत आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने आणखी काही शक्यता मांडल्या आहेत. शाळेतील आणखी काही मुलींसोबत असे प्रकार झाले असल्याच्या संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळं शिशुवर्गात शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना एसआयटीकडून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत. शाळेतील आणखी काही मुलींसोत असे प्रकार झाले असल्याचं पालकांनी समोर यावं, असं अवाहन एसआयटीने केलं आहे.

सध्या सरकारने जी चौकशी समितीने नेमली आहे त्यात एसआयटीचा समावेश आहे. एसआयटीच्या तपासानुसार, नराधम अक्षय शिंदे हा 15 दिवस स्वच्छता कर्मचारी म्हणून त्या शाळेत काम करत होता. या 15 दिवसांत त्याने आणखी काही मुलींसोबत दुष्कृत्य केलंय का? याचा शोध तपास यंत्रणांकडून घेत आहेत. त्यामुळं तपास यंत्रणांनी शाळेतील मुलींच्या पालकांना मेसेज पाठवले आहेत. मुलींबाबत असा काही प्रकार घडलेत का तर पुढे या आणि तक्रार करा. जेणेकरुन अक्षय शिंदेविरोधात आणखी पुरावे गोळा करण्यात येतील.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Badlapur School Crime Badlapur Crime Mumbai High Court Badlapur News Sexual Assault Bombay High Court Hearing On Badlapur School Case Mumbai News Mumbai News Today Latest Mumbai News Latest Maharashtra News बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण बदलापूर शाळा गुन्हा बदलापूर गुन्हा मुंबई उच्च न्यायालय बदलापूर बातम्या लैंगिक अत्याचार बदलापूर शाळा प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुना मुंबई बातम्या

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?Badlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थिनींवर अत्याचार केला आहे
Weiterlesen »

बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचारबदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचारBadlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थ्यांवर अत्याचार केला आहे
Weiterlesen »

बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...Crime News In Maharashtra: बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे.
Weiterlesen »

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक, शाळेतील CCTV फुटेजही गायब?बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक, शाळेतील CCTV फुटेजही गायब?Badlapur Case : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने २४ तारखेला महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. बदलापूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
Weiterlesen »

महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रियामहाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रियाBadlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर रितेश देशमुखने आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करुन दिली आहे.
Weiterlesen »

आता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारआता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारबदलापूर पाठोपाठ आता पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 07:45:45