Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती
लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटाका बसला आहे. तर, त्या तुलनेत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले आहे. राज्यात भाजपच्या 9 जागा आल्या आहेत. तर, अजित पवार गटाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आता मविआने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो, अशी चर्चा असतानाच उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक असे दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. उत्तर महाराष्ट्रातून शरद पवार यांनी दोन खासदार निवडून आणल्यानंतर पवार गटाची ताकद तिथं वाढली आहे. स्थानिक राजकी. परिस्थितीदेखील महाविकास आघाडीला अनुकूल असल्याने पवार गटात जाण्याचा अजित पवार गटातील आमदाराचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेच्या 13 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस सध्या मोठा भाऊ ठरला आहे. मात्र असे असतानाही काँग्रेस पक्षातील एक नाराज आमदार शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती समोर येतं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी पक्षांतराचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा आहे. हे दोन आमदार कोण आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांच्या बंगल्यांवर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली.
Ajit Pawar Lok Sabha Elections BJP Government Duties Devendra Fadnavis Resigns Maharashtra Lok Sabha Elections Maharashtra Polls Sharad Pawar News Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP News
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
राज्यातील 'या' दोन शेतकरी नेत्यांनी महायुतीला तारलं, शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना झाला फायदाMaharashtra Loksabha Nivadnuk Nikal: महाराष्ट्रात अनपेक्षित असा निकाल लागला आहे. अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. भाजपलादेखील अपेक्षित यश मिळालेलं नाहीये.
Weiterlesen »
लोकसभा निवडणुका संपण्याआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार? मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार?लोकसभा निवडणुकीआधी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरु झालीय. कारण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेलं विधान.
Weiterlesen »
EVM ठेवलेल्या गोदामात घुसखोरी! ट्रीपल लेअर सिक्योरिटी भेदत प्रवेश; समोर आला धक्कादायक VideoEVM Godown CCTV Tampering Attempt Video: यापुर्वीही बारामतीमधील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही काही काळ बंद झाल्याची तक्रार तेथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली होती.
Weiterlesen »
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील 'या' 14 गावांचे नागरिक दोन राज्यांसाठी करतात मतदान, काय आहे कारण?Loksabha Election 2024 : राज्याच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं असून, एका जिल्ह्यात येणारी जवळपास 14 गावं दोन राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदान करतात.
Weiterlesen »
विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांची नावं जाहीर; पक्षानं कोणावर सोपवली जबाबदारी?Maharashtra Politics 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा संपल्यानंतर अखेर पुढे ढकलण्यात आलेल्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे.
Weiterlesen »
Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.
Weiterlesen »