Indian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंध
भारतीय रेल्वेनं आतापर्यंत कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास सुकर आणि सुखकर केला आहे. अशा या रेल्वे विभागानं सातत्यानं काही नवनवीन संकल्पना राबवत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून प्रवाशांना नवनवीन अनुभव देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. याच प्रयत्नांपैकी एक म्हणजे वंदे भारत रेल्वे . भारतातली पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन अशी ओळख असणाऱ्या वंदे भारत ट्रेनची सुरुवात 15 फेब्रुवारी 2019 पासून झाली. दिल्ली आणि वाराणासीदरम्यान पहिली वंदे भारत धावली होती.
आजच्या घडीला देशात तब्बल 102 वंदे भारत ट्रेन असून, 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह ही रेल्वे 284 जिल्ह्यांमधून साधारण 100 वेगवेगळ्या मार्गांवरून धावते. उपलब्ध आकडेवारीनुसार या रेल्वेनं आजमितीस 2 कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून, 2023 ते 2024 या आर्थिक वर्षादरम्यान वंदे भारत ट्रेननं मारलेल्या फेऱ्या आणि पूर्ण केलेलं अंतर पाहता ते पृथ्वीच्या 310 फेऱ्या मारण्यासमान आहे.
माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या वंदे भारतच्या उत्पन्नासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तर स्वरुपात ही माहिती समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारत रेल्वेंच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वेगळा अहवाल उपलब्ध नसल्याचं इथं स्पष्ट करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशच्या चंद्रशेखर गौड यांनी रेल्वे मंत्रालयानं मागील 2 वर्षांमध्ये वंदे भारत रेल्वेंच्या माध्यमातून किती रक्कम मिळवली, या रेल्वेगाड्यांमुळं नफा झाला की तोटा? यासंदर्भातील प्रश्न RTI अंतर्गत विचारला होता.
दरम्यान, अर्थविषयक सर्वेक्षण आणि अहवालांमध्ये उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार वंदे भारत आणि तत्सम नव्या रेल्वेंमुळं भारतीय रेल्वेच्या मिळकतीत साधारण 7 टक्क्यांनी भर पडते. मागील वर्षी एकट्या महाराष्ट्रात मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमुळं अवघ्या 25 दिवसांत 10.72 कोटी रुपयांची कमाई करून दिल्याची माहिती समोर आली होती. तेव्हा आता वर्षभराच्या कमाईची आकडेवारी किती असेल याचा अंदाज तुम्ही लावूच शकता.
Vande Bharat Indian Railway News Indian Railway Reservation Indian Railway Trains Indian Railway Time Table Indian Railway Pnr Number Vande Bharat Train Vande Bharat Train Time Table Vande Bharat Speed Vande Bharat Sleeper Vande Bharat Train From Mumbai Vande Bharat Express Mumbai To Goa मुंबई वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वे
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
Weiterlesen »
सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोरFiring On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.
Weiterlesen »
Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
Weiterlesen »
Indian Food Recipes in Hindi: India Dishes, भारतीय व्यंजन, Indian CookingIndian Food Recipes (भारतीय व्यंजन): Find latest Indian Recipes, Indian Cooking, Recipe in Hindi, Easy and Simple Indian Recipes, Indian Food dishes in Hindi on Dainik Jagran
Weiterlesen »