यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार सभांचा अंतिम दिवस आहे. याच निमित्ताने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला."येत्या चार जूनपासून अच्छे दिनची सुरुवात होईल", असे उद्धव ठाकरेंनी म्हटले."देशात सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. महाराष्ट्र, मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान होत आहे. मुंबई लुटून गुजरातला नेण्याचा डाव आहे.
"बेकायदा सरकार आणि अंसवैधानिक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान स्वतःच्या हुकूमशाहीचा प्रचार करत आहेत. जो देईल साथ, त्याचा करू घात हीच भाजपची नीती आहे. देशातील सर्व पक्ष संपवून भाजपच हा एकच पक्ष असेल, असे जे.पी. नड्डा म्हणाले होते. आता त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही गरज राहिली नाही. ज्या संस्थेने त्यांना जन्म दिला. त्याच संस्थेची आता त्यांना गरज राहिलेली नाही. आता भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली स्वयंसेवक संघ म्हणतील. तसेच ते आता संघावरही बंदी घालतील.
"जे लोक देशभक्त शब्दांवर आक्षेप घेतात, ते हिंदू किंवा देशभक्त नाहीत का, असा सवालही त्यांनी केला. सर्व हिंदू हे देशभक्त आहे. देशभक्त हा सर्वांना सामावून घेणारा शब्द आहे. देशभक्तमध्ये देशातील सर्व जातीधर्माचे नागरिक आहेत. जे देशभक्त शब्दाला आक्षेप घेतात, ते देशद्राही आहेत", असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठा दावा केला."महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे. 48 पैकी कमीत कमी 46 जागा जिंकू असं वातावरण आहे.
"मोदी सरकारने इतर राज्यातही फोडाफोडीचे राजकारण केले. त्याविरोधात इंडिया आघाडी लढत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, हीच मोदी यांची लोकशाही आहे काय? सर्व सरकारी यंत्रणा मोदींच्या इशाऱ्यावर चालतात. मात्र, आता निवडणुकीत तसेच होणार नाही. आता जनताच या लढ्यात उतरली आहे. त्यामुळे आता जनतेचा विजय होणार आहे", असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले."मोदी दरवेळी विरोधकांवर आरोप करत विरोधकांना देशद्रोही ठरवत स्वतः देशप्रेमी असल्याचे ढोंग करत आहेत.
"काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक आश्वासने दिली आहेत. भाजपने जनतेशी विश्वासघात केला आहे. धमकी, दबावतंत्र आणि प्रलोभने दाखवत इतर पक्ष फोडण्यात आले. तसेच मूळ पक्ष इतरांना देण्यात आला. पंतप्रधान त्यांच्या भाषणात द्वेष पसरवत आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी अशा प्रकारची द्वेषपूर्ण वक्तव्ये केलेली नाही. महाराष्ट्रात बेकायदा पद्धतीने महायुतीचे सरकार बनवण्यात आले. या असंवैधानिक सरकारला पंतप्रधान पाठिंबा देतात", असेही मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटले.
India Alliance Shivsena Uddhav Thackeray BJP RSS Mallikarjun Kharge Mallikarjun Kharge On Loksabha Seats Loksabha Election 2024
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Weiterlesen »
2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचं वैभव लुटलंय, नाशकातून उद्धव ठाकरेंचा घणाघातNashik Uddhav Thackeray: एकीकडे मुंबई पंतप्रधान मोदींची भव्य रॅली सुरु असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार निशाणा साधला. नाशिकमध्ये सभेतील उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. मोदी, शहांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. मोदींची मणिपूरमध्ये जाण्याची हिम्मत नाही, असे ते म्हणाले.
Weiterlesen »
Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा.
Weiterlesen »
चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा?Chardham Yatra : चारधाम यात्रे दरम्यान आता तुम्हाला खास क्षण कॅमेऱ्यात कैद करता येणार नाही. कारण सरकारने नवीन नियमांनुसार मोबाईलवर बंदी घातली आहे.
Weiterlesen »
'..तर उद्धव ठाकरे तुरुंगात असतील'; जामिनावर बाहेर आलेल्या केजरीवालांचं सभेत विधानKejriwal Speech Mention Uddhav Thackeray: केजरीवाल यांनी नवी दिल्लीमधील आम आदमी पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये समर्थकांना संबोधित केलं. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.
Weiterlesen »
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावाउद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
Weiterlesen »