LokSabha Election Voting: बॉलिवूड अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदान करण्याचं महत्त्व सांगितलं.
LokSabha Election Voting: बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदान करण्याचं महत्त्व सांगितलं.LokSabha Election Voting: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मतदानासाठी सकाळपासून काही मतदान केंद्रांवर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. काही मतदान केंद्रांवर मात्र मतदारांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अनेक मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरत आहे.
परेश रावल यांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचून आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदान करणं किती महत्वाचं आहे याबद्दल सांगितलं. तसंच मतदान न करणाऱ्या नागरिकांप्रती संताप व्यक्त केला असून, त्यांना शिक्षा दिली पाहिजे असं म्हटलं आहे. "तुम्ही म्हणाल सरकार हे करत नाही, सरकार ते करत नाही. पण जर आज तुम्ही मतदान केलं नाही तर सरकार नाही, तर तुम्ही जबाबदार असाल," असं परेश रावल म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी नागरिकांना आपलं कर्तव्य बजावण्यास सांगितलं.| Bollywood actor Paresh Rawal says,"...There should be some provisions for those who don't vote, like an increase in tax or some other punishment."दरम्यान यावेळी त्यांनी जे मतदार मतदान करणार नाहीत त्यांना दंड ठोठावला जावा असं मतही मांडलं.
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. अक्षय कुमार, शाहिद कपूर, सान्या मल्होत्रा, राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिवशी मुंबईतील आपापल्या मतदान केंद्रावर मतदान केले.
Lok Sabha Election Paresh Rawal
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 'गँरटी'Loksabha Election 2024: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहिरनामा जाहीर केला आहे.
Weiterlesen »
Loksabha Election 2024 : 'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले..' संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करताच, क्षणात व्हायरलLoksabha Election 2024 : महाराष्ट्रात आणि देशातही अनेक मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडत असतानाच संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला.
Weiterlesen »
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Weiterlesen »
सांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल', ठाकरे गटाला टेन्शन... विशाल पाटलांची माघार नाहीचSangali loksabha election 2024 : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता सांगलीत त्रिशंकू मतदान होणार आहे.
Weiterlesen »
Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.
Weiterlesen »
'काल रात्री आमचं बोलणं झालं, तो भविष्यात...', रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? मार्क बाउचर म्हणाले...Mark Boucher On Rohit Sharma : रोहित शर्मा आता पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, अशी चर्चा सुरू असताना मार्क ब्राउचर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Weiterlesen »