Sandhan Valley: सांदण दरीत पर्यटकांना जाण्यासाठी चार महिने प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. वन्यजीव विभागाने हा निर्णय घेतला आहे.
मान्सूनची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील विविध भागात मान्सूनने हजेरी लावली आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. गड- किल्ले, धबधबा किंवा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची पावलं वळतात. आपला महाराष्ट्र निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. अशावेळी पर्यटक या पर्यटनस्थळी गर्दी करतात. मुंबईजवळचा अहमदनगर जिल्हाही सौंदर्याने नटलेला आहे. तुम्हीदेखील पावसाळ्यात नगरला फिरण्यासाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात साम्रद येथे आशिया खंडातील सर्वात खोल अशी सांदण दरी आहे. प्रत्येक वर्षी देशभरातील हजारो पर्यटक सांदण दरीला भेट देत असतात. मात्र पावसाळ्यात या दरीच्या प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाने चार महिने सांदण दरी येथे प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सांदण दरीला भेट देण्यासाठी देशभरातून पर्यटक येत असतात. मागील वर्षी जून महिन्यात अचानक आलेल्या पावसामुळं तब्बल 500 पर्यटक अडकले होते. मात्र, वनविभाग आणि इतर सुरक्षा रक्षकांनी वेळीच मदत केल्याने या पर्यटकांचे प्राण वाचवले होते. त्यामुळं पावसाळण्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते. पावसाचं पाणी याच दरीतून खाली कोसळते. पावसामुळं दरीमध्ये पाणी साचते आणि पाण्याचा ओघ वाढल्याने बाहेर पडणे अशक्य होते. त्यामुळं अशा परिस्थितीत पर्यटकांच्या जीवावर बेतू शकते.
Ahmednagar Tourist Places Sandhan Valley Remain Closed For Next Four Months Sandhan Valley Maharashtra Village महाराष्ट्र पर्यटन सांदण दरी सांदण दरी बंद
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Video : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुपPune News : पुण्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं कोणत्या शहरात झालंय सर्वाधिक नुकसान.... विमान प्रवास करणार असाल तरीही पाहा ही मोठी बातमी
Weiterlesen »
कोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्जKonkan Railway Bharti:चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Weiterlesen »
धक्कादायक! मतदानकेंद्रावरील टॉयलेटमध्ये मृतावस्थेत आढळला ठाकरे गटाचा बूथ एजंटPolling Agent Found Dead Inside Toilet: आदित्य ठाकरे यांनीही या पोलिंग बूथ एजंटच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त केला असून ही बातमी अत्यंत धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.
Weiterlesen »
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदPune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.
Weiterlesen »
महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जिथं समुद्राच्या लाटा गणपतीच्या मूर्तीला करतात चरणस्पर्श; कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या गणपतीपुळे मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
Weiterlesen »
महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडाbuddha purnima 2024 : मुंबईच्या धावपळीतून मन:शांती शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर पॅगोडाला आवर्जून भेट द्या.
Weiterlesen »