महाराष्ट्रात पुन्हा 'सैराट'! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News Nachrichten

महाराष्ट्रात पुन्हा 'सैराट'! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या
Maharashtra News UpdateMaharashtra Live Newsमहाराष्ट्र ताज्या बातम्या
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Maharashtra Crime News: महाराष्ट्रात ऑनल किलिंगची घटना घडली आहे. परभणीत जन्मदात्या आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केली आहे.

महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची गळा आवळून खून केली आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील नाव्हा येथे 21 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. या घटनेला दहा दिवस उलटून गेल्यानंतर हत्येचे प्रकरण उजेडात आलं आहे. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या घटनेने समाजमन सून्न झाले आहे.

इतर जातीच्या मुलाबरोबर विवाह का करतेस? म्हणून परभणीत १९ वर्षीय मुलीचा जन्मदात्यानेच खून केला आहे. २१ एप्रिल रोजी ही घटना घडल्याचे सांगितले जातेय. त्यानंतर कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीत मयत मुलीचे प्रेत रात्री जाळून पुरावा नष्ट करण्यात आला आहे. मुलीच्या अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्या लोकांनाही घटनेची माहिती होती. पण याबाबत कोणीही पोलिसांना कल्पना दिली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय तरुणीचे गावातीलच अन्य जातीतील मुलावर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुलीनी इतर जातीतील मुलासोबत लग्न करु नये, म्हणून तिच्यावर आई-वडिल दबाव टाकत होते. मात्र तरीही तिने त्याच मुलासोबत लग्न करण्याचा निर्धार केला होता. म्हणून पालकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम होती. 21 एप्रिलच्या रात्री पालकांनीच तिची हत्या करत गपचुप तिचा मृतदेह जाणून टाकला.

महाराष्ट्रात ऑनर किलिंगचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नव्हे तर, आई-वडिलांना समजवण्याच्या ऐवजी भावकीतील लोकांनी त्यांच्या या कृत्याला पाठिंबा देत या गुन्ह्यात सहभागी देखील झाले होते. पालम पोलिसांत पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत तरुणीचे आई, वडील आणि भावकीतील इतर सहा जण अशा एकूण आठ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाराष्ट्र

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra News Update Maharashtra Live News महाराष्ट्र ताज्या बातम्या महाराष्ट्र आजच्या बातम्या महाराष्ट्र ऑनर किलिंग Maharashtra Honour Killing Parbhani Honour Killing Murderd Daughter Over Love Marriage

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

लेकाच्या आजारपणाला बाप वैतागला, सततच्या रडण्याने संतापून दीड वर्षांच्या बाळाची केली हत्यालेकाच्या आजारपणाला बाप वैतागला, सततच्या रडण्याने संतापून दीड वर्षांच्या बाळाची केली हत्याMumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनीच मुलाची हत्या केली आहे.
Weiterlesen »

कोकणात भाजपची गोची? शिवसैनिकांनी थांबवला नारायण राणेंचा प्रचारकोकणात भाजपची गोची? शिवसैनिकांनी थांबवला नारायण राणेंचा प्रचारShiv Sainiks Stopped Narayan Ranes Campaign:रत्नागिरीत भाजप उमेदवार नारायण राणेंच्या प्रचाराचा पक्षादेश मान्य करत प्रचाराला लागलेले शिवसैनिक पुन्हा एकदा थांबल्याची बातमी समोर येत आहे.
Weiterlesen »

'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?दरम्यान, सरबजीत सिंग यांची क्रुरपणे हत्या करणारा आरोपी अमीर सरफराज उर्फ तांबाची काल रविविरी पाकिस्तानच्या लाहौरमध्ये काही अज्ञा हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली.
Weiterlesen »

'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊतSanjay Raut: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण असून पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जवळपास सर्वच जागा जिंकेल असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
Weiterlesen »

वाढता वाढता वाढे...; ऐन लग्नसराईच्या काळात सोनं महागलं; आजचे दर जाणून घ्या!वाढता वाढता वाढे...; ऐन लग्नसराईच्या काळात सोनं महागलं; आजचे दर जाणून घ्या!Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. आज शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरांना झळाळी आली आहे.
Weiterlesen »

नागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामाननागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामानUnseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 05:03:43