India Won T20 World Cup 2024 : सामना हातातून जात असल्याचं लक्षात येताच रोहित शर्माने आपला हुकमी एक्का बाहेर काढला अन् सामना जिंकत वर्ल्ड कपवर नाव कोरलं.
आयसीसी टी20 विश्वचषकातील फायनल सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून टी-ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडिया विश्वविजेती बनली आहे. त्यामुळे आता संपूर्ण भारतात दिवाळी साजरी केली जातीये. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीमुळे वर्ल्ड कप जिंकता आलाय. मात्र, रोहित शर्माचा एक निर्णय सर्वात निर्णायक ठरला.
झालं असं की, टीम इंडिया विजयाच्या मार्गावर होती. मात्र, हेन्रिक क्लासेनने दांडपट्टा चालवला अन् टीम इंडियाच्या हातातून विजय निसटू लागला. क्लासेनने अक्षर पटेलला चोप दिला अन् त्याच्या 15 व्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा कुटल्या. त्यात त्याने दोन फोर आणि दोन सिक्स मारले. त्यामुळे आता सामना रोमांचक स्थितीत आला होता. साऊथ अफ्रिकेला 30 बॉलमध्ये 32 धावांची गरज असताना रोहित शर्माने बुमराहला ओव्हर दिली. त्यात बुमराहने केवळ 4 धावा दिल्या. त्यामुळे सामन्यात संतुलन आलं.
रोहितने एक मोठा निर्णय घेतला. रोहितने आपला हुकमी एक्का म्हणजे हार्दिक पांड्याला गोलंदाजीला बोलवलं. तिथं कमी तिथं आम्ही अशी भूमिका पांड्याने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बजावली आहे. त्यामुळे रोहितने पांड्याला ओव्हर दिली अन् पांड्याने पहिल्याच बॉलवर क्लासेनला तंबूत पाठवलं. क्लासेनची विकेट गेली अन् रोहितने सुटकेचा श्वास घेतला.अखेरच्या ओव्हरमध्ये देखील जेव्हा टीम इंडियाला 16 धावा रोखायच्या होत्या. तेव्हा पांड्याने केवळ 6 धावा दिल्या अन् सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकवला.
Hardik Pandya Suryakumar Yadav T20 World Cup 2024 India Vs South Africa Final 20 WC Final Jasprit Bumrah Virat Kohli Latest Cricket News
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Rohit Sharma: ना पीच, ना रिझर्व्ह डे, ना पराभव...; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माला सतावतेय भलतीच चिंता!Rohit Sharma: आज भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमीफायनल खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने एक मोठं विधान केलं आहे.
Weiterlesen »
Lockie Ferguson : 4 ओव्हर, 4 मेडन अन् 3 विकेट्स..! टी-20 विश्वचषकात असं पहिल्यांदाच घडलंLockie Ferguson Maiden Overs Record : ना बुमराहला जमलं ना शाहीनला पण लॉकी फर्ग्युसन अफलातून कामगिरी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) करून दाखवलीये.
Weiterlesen »
AC बंद… 20 घंटे की देरी और गर्मी से बेहोश होते यात्री, एअर इंडिया का ऐसा हाल पहले कभी नहीं दिखायात्री बेहोश होते दिख रहे हैं, गर्मी से तड़प रहे हैं, लेकिन ना उनकी कोई मदद कर रहा है और ना ही किसी तरह की एयरलाइन से उन्हें सहायता मिल रही है।
Weiterlesen »
Imran Khan Troll: इमरान खान को यूजर ने पैसों के लिए किया ट्रोल, एक्टर ने दिया मुंहतोड़ जवाबइमरान खान ने 2008 में जेनेलिया डिसूजा के साथ फिल्म 'जाने तू...या जाने ना' से अपने एक्टिंग करियर की शुरुआत की थी.
Weiterlesen »
Maharastra Politics : ना मुंडे ना महाजन, महाराष्ट्रात भाजपचं कमळ रुजवणाऱ्या पर्वाचा अस्त?Munde Mahajan Politics : महाराष्ट्रात मुंडे आणि महाजन ही भाजपमधील दोन दिग्गज घराणी.. मुंडे महाजनांनंतर त्यांच्या मुली संसदेत होत्या.. मात्र 2024 च्या निवडणूकीत मात्र या दोन्ही कुटुंबातील कोणाही संसदेत नसणार आहे. पाहुया स्पेशल रिपोर्ट
Weiterlesen »
बारिश में बिगड़ ना जाए आपका AC, कभी ना करें ये गलतीमानसून के दौरान कूलर आदि अच्छे से काम नहीं करते हैं. इसके लिए AC की काफी जरूरत पड़ती है. ऐसे में कई लोग अपने AC पर ध्यान नहीं देते हैं और वो खराब तक हो सकता है.
Weiterlesen »