भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली पुढील वर्ल्डकपसाठी उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याबाबत चर्चा रंगली असून, शंका व्यक्त होत आहेत. रोहित आणि विराट कोहली यांनी टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान गौतम गंभीरने आपल्या योजनेत रोहित आणि विराट यांना स्थान असून दोघांमध्ये अद्याप बरंच क्रिकेट शिल्लक असल्याच म्हटलं आहे. दरम्यान भारतीय संघाचे माजी खेळाडू के श्रीकांत यांनी गौतम गंभीरच्या जुन्या विधानाची आठवण करुन दिली आहे. ज्यामध्ये त्याने जर वरिष्ठ खेळाडू टी-20 मध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले तर त्यांना संघात स्थान नसेल असं म्हटलं होतं.
"गौतम गंभीरने यू-टर्न घेतला आहे. 2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी तो म्हणत होता की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कामगिरी केली नाही तर ते माझ्या संघात बसणार नाहीत. मात्र आता त्याने यू-टर्न घेतला असून विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू नाहीत असं म्हणत आहेत. मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर त्याने सांगितलं की, दोघांकडे खूप क्रिकेट शिल्लक आहे आणि आशा आहे की ते 2027 च्या विश्वचषकासाठी ते फिट असतील,” Dmx श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले.
"तो एक चांगला खेळाडू आहे, पण सध्या त्याचं वय 37 आहे, आणि पुढील एकदिवसीय विश्वचषकासाठी अजून तीन वर्षे पुढे आहे. तेव्हा तो 40 वर्षांचा असेल. म्हणजे, जोपर्यंत तुम्ही धोनी किंवा सचिनसारखे सुपर-फिट नसाल तर वयाच्या 40 व्या वर्षी खेळू शकत नाही. माझ्या मते विराट कोहली 2027 चा वर्ल्डकप नक्की खेळेल. पण रोहितच्या बाबतीत अती केल्यास तो दक्षिण आफ्रिकेत बेशुद्ध पडेल," असंही ते पुढे म्हणाले.
2027 एकदिवसीय विश्वचषक आफ्रिकेत आयोजित केला जाईल. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.Full Scorecard →
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'जर दक्षिण आफ्रिकेला हरवायचं असेल तर...,' भारताच्या वर्ल्डकप विजेत्या माजी खेळाडूने सांगितला गेमप्लानT20 World Cup India vs South Africa: एकीकडे भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकत 13 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असेल तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका पहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.
Weiterlesen »
Maharashtra Weather News : चिंतेची चाहूल! पुढील 24 तासांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार; पण त्यानंतर...Maharashtra Weather News : पावसाळी सहलींचे बेत आखणार असाल, तर आताच सावध व्हा! अतिउत्साहाच्या भरात केलेली चूक पडेल महागात.
Weiterlesen »
...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाहीFASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात
Weiterlesen »
Team India: दक्षिण आफ्रिकेमध्ये तो बेशुद्ध पडेल...; वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूची रोहित शर्मावर टीकाTeam India: टीम इंडियाचे माजी खेळाडू श्रीकांत यांनी एका युट्यूब शोमध्ये रोहित शर्माच्या फिटनेसवरून प्रश्न उपस्थित केल्याचं दिसून आलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने 2027 चा वर्ल्डकप खेळू नये.
Weiterlesen »
रोहितपेक्षा ट्रॅव्हिस हेडच भारी! मांजरेकरांचा दावा; म्हणाले, 'त्याची खेळी सर्वोत्तम कारण...'Sanjay Manjrekar Mention Rohit Sharma Praises Travis Head: रोहित शर्माने सुपर 8 च्या सामन्यामध्ये 92 धावा केल्या तर धावांचा पाठलाग करताना हेडने भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकवला.
Weiterlesen »
'फेम आणि पावरने त्याला...' विराट कोहलीबद्दल टीममेटचा मोठा दावा, तर 'रोहित शर्मा आजही...'Amit Mishra on Virat Kohli : विराट कोहलीला फेम आणि पावरने बदललंय, असा मोठा दावा टीममेटने केलाय. तर रोहित शर्माबद्दलही त्याने सांगितलंय.
Weiterlesen »